सासवणे येथे स्व. विकास [बाबूशेठ ] शिलदणकर स्मृती चषक कुस्ती स्पर्धा २०२४ संपन्न
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
सासवणे येथे स्व. विकास [बाबूशेठ ] शिलदणकर स्मृती चषक कुस्ती स्पर्धा २०२४ संपन्न
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: रविवार दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सासवणे येथे माता फुलाई देवीच्या प्रांगणात स्व. विकास [ बाबुशेठ ] शिलदणकर यांच्या स्मरणार्थ शिलदणकर परिवार व ग्रामस्थ मंडळ, सासवने यांच्या वतीने स्व. विकास [ बाबूशेठ ] शिलदणकर स्मृती चषक भव्य दिव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्व. विकासशेठ शिलदणकर यांच्या पत्नी सासवणे ग्रामपंचायत सदस्या नयनाताई शिलदणकर, स्व.विकासशेठ यांचे सहकारी व मित्र परिवार तसेच शिलदणकर परिवार आणि ग्रामस्थ मंडळ, सासवने यांनी खूप मोठी मेहनत घेतली. स्पर्धेला शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुखा चित्रलेखाताई पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहून याप्रसंगी आपल्या मनोगतातून स्व. विकासशेठ शिलदणकर यांच्या समाजकार्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
स्पर्धेला शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंतभाई पाटील, रायगड जिल्हा परीषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परीषद माजी सदस्या चित्राताई पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, सवाई पाटील आवर्जून उपस्थित होते.
त्याचप्रमाणे स्पर्धेला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते रायगड जिल्हा परीषद माजी सदस्य शंकरराव म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य रविंद्र ठाकूर [ काका ], रायगड जिल्हा परिषद माजी सदस्या रविनाताई ठाकूर, अमिर मधुकर ठाकूर, चेंढरे ग्रामपंचायत माजी सरपंच यतिन घरत, सासवणे सरपंच संतोष गावंड, सासवणे ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजेंद्र शिलदणकर, सासवणे ग्रामपंचायत माजी सदस्य अशोक म्हात्रे, माजी सदस्य रविंद्र भगत, सासवणे ग्रामपंचायत सदस्या अस्मिता पाटील, धोकवडे ग्रामपंचायत माजी सदस्य शिवप्रसाद तोडणकर, सामाजिक कार्यकर्ते तोडणकर गुरुजी, गजानन पाटील, रायगड जिल्हा व अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सहसचिव व अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस व बा.ना.हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक प्रमोद भगत सर, अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष रविंद्र घासे, खजिनदार वैभव मुकादम, सहसचिव विलास पाटील, सदस्य जयेंद्र म्हात्रे, दिलखुश क्रिडा मंडळ महिला कबड्डी संघाचे प्रशिक्षक संदेश वर्तक, नितिन गावंड आवर्जून उपस्थित होते.
स्पर्धेसाठी पंच म्हणून सुधाकर पाटील, प्रसन्न पाटील, कुलदिप पाटील, जितेंद्र गावंड, वैभव मुकादम, अंकुर घरत, मिलिंद भगत, प्रकाश भगत, भालचंद्र म्हात्रे यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून प्रशांत ठाकूर व ज्ञानेश्वर नाखवा, यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन गजानन पाटील, दयानंद म्हात्रे, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सहसचिव प्रमोद भगत सर यांनी तर सूत्रसंचलन धनंजय भगत यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा, पंचांचा, गुणलेखकांचा, सुत्रसंचालक व समालोचकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
तसेच याप्रसंगी महाराष्ट्र पोलिस दलात महिला काॕन्स्टेबल पदावर निवड झाल्या बद्दल दर्शना पाटील या महिला कबड्डी खेळाडूचा तसेच मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकविल्या बद्दल कुमारी सुरक्षा थळे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेमध्ये नाशिक, डोम्बिवली, ठाणे [ हेडुटणे ], कल्याण [ सापाडा ], रायगड व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
स्पर्धेमध्ये पुढील संघांनी यश संपादन केले.
*प्रथम क्रमांक–* जय हनुमान तालिम संघ, वाडगाव
*द्वितीय क्रमांक* –श्री.काळभैरव तालीम संघ, आवास
*तृतीय क्रमांक–* श्री.शिवाजी व्यायाम शाळा, आंदोशी. सर्व यशस्वी संघांना व विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.



