Breaking
कोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

“भविष्याचा वेध घेऊन कार्य करण्याची गरज”; अजित पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी.

0 4 8 2 9 0

“भविष्याचा वेध घेऊन कार्य करण्याची गरज”; अजित पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी.

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: रायगड फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या आवाहनानुसार आयोजित जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रम एकाच दिवशी एकाच वेळी करण्याचे आयोजन केले. त्यानुसार अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनतर्फे रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी तळवली स्मशानभूमी परिसर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. कार्य तर सर्वच संघटना करत असतात परंतु भविष्याचा वेध घेऊन कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन या वृक्षरोपण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. अजित पवार यांनी केले.

यावेळी ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे सरपंच श्री. नाशिकेत कावजी, माजी उपसरपंच अनंत वैद्य, रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन उपाध्यक्ष श्री. समीर मालोदे, अलिबाग तालुका अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, कार्याध्यक्ष सुदेश माळी, ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश खडपे, विजय पाटील, गणेश जाधव, सोनू असरणी, मार्मिक पाटील, संदेश कवळे, निवृत्ती कोळी, वैभव शिंदे, कुणाल थळे, भूषण पाटील, विराज घरत, योगेश सावंत, अनीकेत म्हात्रे, निलेश दुदम, अमर मढवी, मनोज पाटील, सुरेंद्र वेळे, सुधीर पाटील, दिप नाईक व तळवळी ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमास रोपे उपलब्ध करून देण्यात सामाजिक वनीकरणचे वनाधिकारी श्री. प्रसाद गायकवाड यांचे विशेष योगदान लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे