Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरभंडारामहाराष्ट्रविदर्भ

न्यु मून शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा गोपालकाला कार्यक्रमाची जल्लोषात तयारी

तारका रुखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

न्यु मून शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा गोपालकाला कार्यक्रमाची जल्लोषात तयारी

गोविंदा आला रे आला | जनमनात आनंद झाला..!

तारका रुखमोडे, जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

गोंदिया/अर्जुनी मोरगाव: श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार मानले जातात.श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.कित्येक ठिकाणी गोपाळकाला करण्याचा प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत.

या वेळी जन्माष्टमीला सोमवार आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगामुळे सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे.या शुभ योग-संयोगात न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल ज्यु. काॅलेज अर्जुनी/मोर. येथे जन्माष्टमी तथा गोपालकाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठी त्याच्या पूर्व पर्वावर जल्लोषात पूर्वतयारीचे आयोजन सुरु आहे. त्यासाठी काॅलेजचे सर्व विद्यार्थी तथा प्राध्यापक, अध्यापकवृंद यांनी उपस्थित राहून श्रीकृष्ण गोपालकाला सोहळ्याची जय्यत तयारी करताहेत. शाळा सजावट, दहीहंडी सजावट, मनोरा सराव ,सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अगदी रंगीत तयारीसाठी सर्व पदाधिकारी तथा शिक्षकवृंद व विद्यार्थी अगदी जल्लोषात परिश्रम घेताहेत.

न्यु मून शाळेने यापूर्वीही विद्यार्थी मनात संस्कृतीमूल्य रुजविण्यासाठी तथा जपण्यासाठी अशा प्रत्येक संस्कृतीमूल्य तथा सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सुंदर संस्कारनिष्ठ सुजाण विद्यार्थी घडावेत हाच यामागचा हेतू आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा गोपालकाल्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे