Breaking
ई-पेपरकवितागोंदियासाहित्यगंध

ये रे श्रावणा

रंजना राहुल ब्राह्मणकर अर्जुनी/मो. जि.गोंदिया

0 4 8 3 0 0

ये रे श्रावणा

ये रे श्रावणा ये रे श्रावणा
हिरवळीवर नाच रे घना||धृ||

वसुधेने नेसला हिरवा शालू
लपत छपत नाचतो भानू
मध्येच वर्षा सिरवे शिंपी
गवत पानावर बिंदूमोती||१||

भुमातेची नवी नवलाई
वाटे घरात नवी सुनबाई
नवा संसार नवा घरदार
शिवारतलं पीक वारा खाई||२||

भोळा सांभाचे उपवास दिस
बेल फुलांचा पुजन मास
सणासुदीचे दिवस व्यस्त
आयाबहीणी नटतात मस्त||३||

संभूदेवाच्या गळ्यात शोभे
शेतातील पिकांना राखे
नागवंशीचा इतिहास सांगे
नागपंचमीचा सण डोले||४||

बहीण भावाचं पवित्र नातं
रक्षाबंधन महत्व सणाचं
दही हंडी फोडण्या गोपाला
श्रीकृष्ण जयंती सण आला||५||

सण आला बैलपोळ्याचा
चिखलात राबणारे बैलांचा
पुजा करून बा तयाची
परतफेड करू उपकाराची||६||

श्रावणमास हर्ष मनास
सणांचा घेऊन हर्ष उल्हास
म्हणून रंजना बोलवे तुला
ये रे श्रावणा,ये रे श्रावणा|७||

रंजना राहुल ब्राह्मणकर
अर्जुनी/मो. जि.गोंदिया

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे