गोंडवाना गणतंत्र पार्टी विधानसभा निवडणूक लढविणार
गोंडवाना गणतंत्र पार्टीची आढाव बैठक संपन्न
गोंडवाना गणतंत्र पार्टीची आढाव बैठक संपन्न
गोंडवाना गणतंत्र पार्टी विधानसभा निवडणूक लढविणार
शहर प्रतिनिधी, नागपूर
नागपूर: गोंडवाना गंणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने सरंपच भवन सिव्हिल लाईन नागपूर येथे नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये हरीष उईके यांनी पत्रकारांना माहिती दिली की गोंडवाना गणतंत्र पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारत आदिवासी पार्टी या सर्वांना एकत्रित करून आम्ही 2024 ची येणारी विधानसभा निवडणूक लढविणारच !
आज आपल्या देशाला 75 वर्ष स्वतंत्र होऊन झाले परंतु आजपर्यंत आदिवासी लोकांना आरक्षणचा काहीच फायदा मिळाला नाही. फक्त साडेतीन टक्के आरक्षण मिळाले. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आरक्षण ! बेरोजगारी, महागाई आणि गोंडवाना विदर्भ राज्य अलग झाले पाहिजे. विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे. ह्या मुद्द्याला घेऊन रविवारी आढावा बैठक घेण्यात आली. संविधानिक हक्क मिळण्यासाठी येणाऱ्या 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढविणार असे हरिष उईके यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी हरिष उईके प्रदेश अध्यक्ष, बलबिर सिंह तोमर, विजयप्रताप सींग, सांसद जोहरीलाल इनवाले, हरविंदर सिंह मारको, दिनेश सिडाम, नंदलाल उईके, अमीनदास टांगीया, मेहतालाल वरखडे, सत्तारसींग वलाशी. रेखाताई निकोरे, ज्ञानसिंग खंडाते, सुधाकर आत्राम, महेश बमनारे, मंगलाताई उईके, मुरली मरस्कोल्हे, रामलाल पट्टा, प्रल्हाद धुर्वे, मनोहरलाल धुर्वे, रूपचंद धुर्वे आणि यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



