Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरबीडमराठवाडासाहित्यगंध

होकार देऊन पहा

0 4 8 2 8 6

होकार देऊन पहा

होकार नका देऊ हो फक्त
प्रियकर आणि प्रेयसीला
होकार देऊन पहा एकदा
वृद्ध थकल्या मायबापाला…

ही सुंदर सृष्टी ज्यांच्यामुळे
बघावयास तुम्हा मिळाली
त्यांनी प्रेम माया नि ममता
तुमच्यावरून ओवाळीली…

त्यांनी उपास तापास काढून
तुम्हाला घातले हो पोटभर
तुमचे पोट भरले की दोघेही
झोपले पाणी पिऊन घोटभर…

फाटके तुटके नि ठिगळाचे
वापरले हो दोघांनीही कपडे
तुम्हाला नवा ड्रेस घेण्यासाठी
पै पै साठवायचे दोघे बापडे…

नकोत त्यांना चंद्र नि तारे
फक्त त्यांना समाधान हवे
गाडी बंगला नि सोने नको
नातवंडे सभोवती खेळावे…

राजश्री मिसाळ ढाकणे बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे