Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

‘रासेयो’ स्वयंसेवकांनी निर्व्यसनी राहून व्यसनमुक्तीचा संदेश पोहचवावा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 2 9 2 1

‘रासेयो’ स्वयंसेवकांनी निर्व्यसनी राहून व्यसनमुक्तीचा संदेश पोहचवावा

रायगड जिल्हा समन्वयक डॉ. प्रविण गायकवाड यांचे प्रतिपादन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग/ रायगड : राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून आपल्या आचरणातून समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश द्यावा. युवकांनी व्यसनांविरोधात सकारात्मक भूमिका घेतली, तर निरोगी आणि सक्षम समाजनिर्मितीला निश्चितच चालना मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले.

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा, रायगड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

डॉ. प्रविण गायकवाड यांनी व्यसनमुक्त समाजाची गरज स्पष्ट करताना युवकांमध्ये वाढणाऱ्या विविध व्यसनांच्या प्रवृत्ती, त्यांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच कुटुंबाचे आर्थिक नुकसान, सामाजिक संबंधांमध्ये दुरावा आणि युवकांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे व्यसनाला सुरुवात होण्यापूर्वीच युवकांनी सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “व्यसनमुक्त समाजनिर्मितीची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. सुरुवातीला व्यसनाबद्दलचा विचार बदलला, तर व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाज बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल,” असा सकारात्मक संदेश दिला. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी केवळ उपक्रमांमध्ये सहभागी न होता सामाजिक परिवर्तनाचे दूत म्हणून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना विभागामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगितले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवत असून त्याच्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. युवकांनी सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील राहून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव, कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता कुंटेवाड, प्रा. भरत चाळके, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सदस्य डॉ. भगवान लोखंडे, प्रा. मनोज वाढवळ, माजी कार्यक्रम अधिकारी डॉ. राजाराम थोरात, प्रा. विजय चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक श्री. विनोद महाजन तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश स्वतःच्या जीवनात अंगीकारून तो कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण होऊन ‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’ या संकल्पनेला सकारात्मक दिशा मिळाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 2 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे