ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध
भीम जयंती
0
4
8
2
9
3
भीम जयंती
बा भीमा
तू आलास
प्रस्थापितांच्या डोक्यावर
मीरे वाटायला
हादरली मनुशाही
आणि ढोंगी सुधारकांचे
बुरखे लागले फाटायला
बा भीमा
तू पेटविलीस
मनामनात ज्योत क्रांतीची
लावली ठिणगी
विझलेल्या स्वाभिमानाला
ज्वाला गगनी भिडल्या
आन घेतांना मातीची
बा भीमा
तू आलास
ज्ञानसागरात पोहून
तुझ्या विद्वत्तेच्या तेजाने
शत्रुही नतमस्तक झाला
तू लिहीले समानतेचे
संविधान नवभारताचे
तथागतांच्या अधिन राहून
बा भीमा
ओलावतात कडा
भीम जयंती करतांना
आम्ही वाहवत चाललो
शब्द तुझे विसरून
दिसते तारूण्य
तुझा फोटो घेऊन नाचतांना
तुझा फोटो घेऊन नाचतांना
सविता धमगाये
नागपूर
0
4
8
2
9
3



