Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्र

श्री स.भु.प्रशालेत राष्ट्रमाता जिजाबाई-स्वामी विवेकानंद जयंती साजरी

प्रतिनिधी: पद्माकर वाघरूळकर, ईश्वर कसबे

0 4 8 2 9 0

श्री स.भु.प्रशालेत राष्ट्रमाता जिजाबाई-स्वामी विवेकानंद जयंती साजरी

प्रतिनिधी: पद्माकर वाघरूळकर, ईश्वर कसबे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

बालानगर (दि.१२ जाने.): पैठण तालुक्यातील श्री सरस्वती भुवन प्रशाला बालानगर येथे राष्ट्रमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती भित्तीपत्रके, भाषणे व वेशभूषा अशा विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, प्रमुख वक्ते संस्कारयाग विभागप्रमुख पद्माकर वाघरूळकर, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक राजू नागरे आणि कार्यक्रमाचे संयोजक वर्ग सहावी अ चे वर्गशिक्षक सुधाकर येवतीकर, जिजामातेच्या वेशभुषेतील जान्हवी गोर्डे व विवेकानंदांच्या वेशभुषेतील जगदिश आळंजकर यांनी राष्ट्रमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. स्वागतगीताने व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. स्थापना औसारे, धनश्री कुटे, तेजल कदे, शुभ्रा गोर्डे, प्रज्ज्वल गोर्डे, अभिषेक कदे या विद्यार्थ्यांच्या स्वहस्तलिखित भित्तीपत्रकांचे विमोचन करण्यात आले.

स्थापना औसारे, अनुष्का लासुरे, शुभ्रा गोर्डे, श्रद्धा रूळे, तेजश्री कदे, इफत शेख, सरिता नरवडे, जान्हवी गोर्डे, श्रावणी देवकर, दामिनी निसर्गे, सौरभ भुजबळ, कार्तिक चव्हाण, स्वराज गोर्डे, सपना हांडे, अनुष्का कुंटेवाड, गौरव भंडारे, शोएब पठाण या विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर भाषणे केली.

प्रमुख वक्ते पद्माकर वाघरूळकर, प्रमुख पाहुणे राजू नागरे यांनी समायोचित विचार प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमी गोर्डे व आभारप्रदर्शन संस्कृती गोर्डे हिने केले. चित्ताकर्षक फलकलैखन कलाशिक्षक प्रदीप ब्राह्मणकार, पंकज पाटील व संजय राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्वच विद्यार्थी व शिक्षकशिक्षकेतर सहकाऱ्यांना सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे