0
4
8
2
9
4
गणिताचे भूत
शाळेत गणिताचे भूत
मानगुटीवर बसले
अजिबात नाही भित
संबोध सारे समजले
अवकाशीय संकल्पना
वर खाली लहान मोठा
भौमितिक आकृत्यांना
आकार असतो वेगवेगळा
संख्याज्ञान झाले पक्के
संख्या वरील क्रिया आल्या
नाणी नोटा पैसे शिक्के
बाजारहाट व्यवहारात
गणिताच्या भूताशी
झाली माझी मैत्री
वैर नाही अपुर्णांकाशी
समजण्याची खात्री
खेळ गाणी गोष्टीतून
सराव झाला भरपूर
नवनविन उपक्रमातून
भुताला ठेवू दुरदुर
ज्योती चारभे
ता. जि.वर्धा
==========
0
4
8
2
9
4



