0
4
8
2
9
7
मनधरणी
पावलांना पंख फुटले सखया
अडथळे पार करते मी अशी
किती करू रे तुझी मनधरणी
तुजसाठी वाट झाली वेडीपिशी
शब्दांचा तुझिया मीच अर्थ होते
जवळी तुझ्या मी निस्वार्थ होते
म्हणाली नदी त्या सागरास तेंव्हा
नदीच्या मनी अवघे भावार्थ होते
मना लागली का ओढ भेटण्याची
तुझे असणे माझे आभाळ होते
वाटते पांघरावे चांदणे तुझे मी
प्रतिबिंबी लाजरीं कोर भाळ होते
गूढ गंभीर गाज तुझीच सख्या रे
कधी लागतो ना तुझा थांग कुणाला
मनी माझ्या असोशी दाटलेली
जाणलेस कधी रे अंतरीच्या
ओढीला
कवेत घेण्या साजणी तुला मी
आतुर जरी, परी निश्चयी,संयमी
कळले सर्व काही न बोलता तुही
जाणते तुझी ती प्रीती अंतर्यामी
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
0
4
8
2
9
7



