Breaking
कवितानागपूरनांदेडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

पाटी पूजन; बळवंत डावकरे

0 4 8 2 9 3

पाटी पूजन

चाहूल ही गर्भारपणाची
सुखावला जीव हा मातेचा
ध्यान तिचे खाणपानाकडे
अन् जप तिचा सुसंस्काराचा

काळ लोटला नऊ मासांचा
असह्य कळांचे वादळ उठले
अवतरला जीव सृष्टीवरती
डोळ्यात आनंदाश्रू दाटले

आद्यगुरू ती माय माझी
हात धरुनी पाटी पूजन
झाला श्रीगणेशा शिक्षणाचा
अ आ इ ई चे सुरु हे भजन

पहिले पाऊल शाळेतले
पोटात भीतीचा उभा गोळा
कसुनशा चेहऱा ओळखून
गुरुजनांनी लावला लळा

घडवले यशस्वी सारे जीवन
आईवडीलांसह गुरुजनांनी
कृतज्ञता मनी सदा तयांप्रती
आदराने वाहू पुष्प तव चरणी

बळवंत शेषेराव डावकरे
जिल्हा नांदेड

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे