0
4
8
2
8
6
क्षण
तुझ्या शब्दांच्या कवेत
चिंब चिंब होई मन
रानवारा असोशीचा
वाट पाही क्षण क्षण
पंख शब्दांनी ल्याईले
झेपावत मनभरी
मधाळशा चाहुलीने
पांघरले अंगभरी
काही घडते अवचित
मन होते अधिरसे
क्षण क्षण चांदण्यात
स्वप्न पाहते मधुरसे
तुझ्या वाटेचे नेत्रांनी
पुन्हा करिते औक्षण
आस उरी जागताना
गंधाळती क्षण क्षण
कसे सांगू मी तुला रे
मन अधिर अधिर
रुंजी घालतो मनात
तुझा चांदण-अबीर
वृंदा(चित्रा)करमरकर
जि.सांगली
0
4
8
2
8
6



