0
4
8
2
9
3
महापूर
बसला होता की दडी धरून
चीत बघत होता ढगाआडून..
आता वाढलाया खूपच जोर
झाला आहे भलता शिरजोर….
नदया ओढे तुडुंब वाहिलेले
घरादारामधी पाणी शिरलेले..
पाणीच पाणी दिसे सर्वदूर
दुथडी भरून वाहतो महापूर….
गावात पाणी, शेतात पाणी
शाळेत पाणी,रस्त्यात पाणी..
शेतकरी तो फिरे अनवाणी
डोळयामधलं लपवत पाणी….
वाटा बंद महापुर आल्यानं
पावसाचा जोर सुरूच वरूनं..
आता तरी उघड वरुणराजा
बस झाली मिळालेली सजा….
संसार उघडा पाण्यात पडला
तुझा तो हेकाकिपणा नडला..
आता तरी तुला येऊ दे कीव
बसलेत मुठीमध्ये धरून जीव….
बी एस गायकवाड
पालम,जि.परभणी
==========
0
4
8
2
9
3



