Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

प्रेम करायला अजून जमलच नाही; सुजीत वाघमारे

0 4 8 2 8 4

प्रेम करायला अजून जमलंच नाही.

कीतीही सुंदर मुलगी दिसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरभरऱ्याच्या झाडावर चढवायला
आम्हाला कधी जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्टया मारत फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायलाअजुन जमलेच नाही

कोणी जर आवडलीच तर
स्वतः हून गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही

दुसऱ्याचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही

कधी हिमंत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या दृष्टीने कधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मिळाले नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्हीही
बऱ्याच सुदर फुलांमधे वावरत होतो
पण जाऊन बसण्यासारखे फुल
अजून आम्हाला दिसलेच नाही

सुजीत वाघमारे
चेरा, जि.लातूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे