संत फ्रान्सिस झेवियर शाळेची यशोपताका
संत फ्रान्सिस झेवियर शाळेची यशोपताका
सिलवासा: दादरा नगर हवेलीच्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर हायस्कूल दुधनी दादरा नगर हवेली ने पुन्हा एकदा सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा मान मिळवला आहे.
संत फ्रान्सिस झेवियर हायस्कूलला सलग तिसऱ्यांदा हा बहुमान प्राप्त होत आहे. मुख्याध्यापक फादर वॉल्टर डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली आणि शाळेचे मॅनेजर फादर सिल्वेस्टर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विजयी घोडदौड सुरू आहे.
यावर्षी दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात अंडर 17 च्या टीमने अजिंक्यपद पटकावत जिल्हास्तरावर उत्तुंग यश संपादन केले. त्यानंतर दमण येथे पार पडलेल्या यू टी लेव्हल सामन्यात दमण संघाचा 4-0 तर दिव संघाचाही 4-0 गोलांनी पराभव करत हे यश संपादन केले.
सदर विजेत्या संघ या महिनाअखेरीस दिल्ली येथे होणाऱ्या सुब्रोतो इंटरनॅशनल फुटबॉल स्पर्धेत या केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करेल. या विजेत्या संघाचे मॅनेजर श्री.विलास लोतडा हे तर मुख्य प्रशिक्षक म्हणून श्री बिपिन कुरकुटे सर यांनी मोलाची भूमिका बजावली.
सदर संघात सचिन बांत्री,विजय वाघरोडिया,अविनाश फडवळ, पियुष कुरकुटिया, दिवेश गवळी,साजन सू, विनेश भावर ,वसंत खानजोडे ,हिमेश खुटाडिया ,सामेश भगतीया,नीलकंठ माढा, अनुज गायकवाड, युवराज नडगे, साहिल गवळी ,रोणी बोरसा व अभय गायकवाड या खेळाडूंचा समावेश आहे.
दीव विरुद्ध च्या सामन्यात दिवेश गवळी या विद्यार्थ्याने दोन गोल तर विजेश वाघ्रोडिया याने एक व सचिन बात्री या विद्यार्थ्याने एक गोल केला. तर दमन विरुद्धच्या सामन्यात सचिन बात्री या विद्यार्थ्यांनी तीन गोल करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले व साजन सोनार या विद्यार्थ्यांनी एक गोल केला.
विजेत्या संघाचे ज्ञानमाता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन फादर डायगो गामा यांनी विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संत फ्रान्सिस झेवियर परिवारात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.



