गौरव अभिजात मराठी २०२५’ राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन
मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे २१ कविता संग्रहाचे प्रकाशन
‘गौरव अभिजात मराठी २०२५’ राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर येथे ७ मे रोजी ‘मराठीचा गजर’
मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे २१ कविता संग्रहाचे प्रकाशन
नागपूर (दि १९) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने, तमाम मराठी मनांची मान अभिमानाने उंचावलेली आहे. मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था’ नागपूर, नेहमीच प्रयत्नशील असते व भाषा सक्षमीकरणासाठी अनेकाविध उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करत असते. येत्या ७ मे २०२५ बुधवार रोजी ‘भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह. टी. व्ही सेंटर रोड, सलीम अली सरोवर नजिक, छ. संभाजीनगर येथे ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ‘राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा’, ‘२१ कवितासंग्रहाचे प्रकाशन’ व ‘अभिजात मराठी विशेषांक २०२५’ प्रकाशन, तसेच पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ या भव्य प्रकाशन समारंभासाठी मुख्य आयोजक व उद्घाटक, डॉ. पद्मा जाधव वाखुरे, अधिव्याख्याता परभणी, अध्यक्ष, मा. आमदार विक्रम काळे (विधान परिषद सदस्य, छत्रपती संभाजी नगर शिक्षक मतदार संघ), मार्गदर्शक, डॉ. बालाजी जाधव (प्रसिद्ध शिवव्याख्याते, कीर्तनकार, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक), ए. बी. पठाण, प्रवक्ते संभाजी ब्रिगेड, प्रमुख अतिथी मा.नरेशभाऊ शेळके सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटर, बुलढाणा, विश्वस्त प्रमुख अरविंद उरकुडे, अशोक लांडगे, संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील उपस्थित राहणार आहेत.
दुपार सत्रात ‘राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा’ होणार असून या स्पर्धेत दिग्गज ४० कवी, कवयित्रींनी सहभाग नोंदवला असून, विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे ३०००,२०००,१००० रोख रक्कम व ५०० रू रोख रक्कम १० उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना सोबत सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व विशेषांक देण्यात येणार आहे.
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेतर्फे सहप्रशासक वैशाली अंड्रस्कर, स्वाती मराडे, प्रा.तारका रुखमोडे, शर्मिला देशमुख घुमरे, संग्राम कुमठेकर, हंसराज खोब्रागडे, प्रतिमा नंदेश्वर, वृंदा करमरकर कार्यक्रमास सहकार्य करीत असून, सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील ‘गौरव अभिजात मराठी आयोजन समिती’ तर्फे ज्येष्ठ साहित्यिका डॉ.पद्माताई वाखुरे जाधव, उद्योजक विजय शिर्के, कवयित्री वर्षाताई मोटे, व्याख्याते अकिल पठाण, ज्येष्ठ कवी विष्णू संकपाळ व प्रशांत ठाकरे सिलवासा हे आयोजन समितीचे पदाधिकारी सर्वतोपरी अतिशय परीश्रम घेत आहेत. अशी माहिती मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष राहुल पाटील व सचिव पल्लवी पाटील यांनी दिली आहे.



