Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरनांदेडमहाराष्ट्रसाहित्यगंध

सुचतंय का?

बळवंत शेषेराव डावकरे

0 4 8 2 9 0

सुचतंय का?

सांग ना सुचतंय का?
की मतीच गुंग झाली
हरवलेल्या नात्यातील
विहीर मायेची आटली

साध्य करण्या साधती
स्वार्थापोटी जवळीकता
हेतू होता सफल एकदा
विसरती लगेच मानवता

होतेय मन माझेच बधीर
भावनाशून्य झाली दृष्टी
अंतर्मनात जत्था प्रश्नांचा
सुचतंय का?पुसते सृष्टी

केला उपवास संवादाने
मुकी होत चालली घरे
आपुलकीच्या भावनांची
परवड का होत असेल बरे

सुचतंय का?आतातरी काही
पेटू देत दीप नात्यागोत्याचे
सापडेल निश्चित उत्तर यातून
सिंहावलोकन कर वर्तनाचे

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे