0
4
8
2
8
6
पडवी
आमच्या आजीच्या पडवीत
कोण राहतो कोण राहतो
पांढरा शुभ्र मोती
राखण तो घराची करतो
आमच्या आजीच्या पडवीत
कोण राहते कोण राहते
जाडजूड वाघाची मावशी
उंदीर सगळे फस्त करते
आमच्या आजीच्या पडवीत
कोण दिसतो कोण दिसतो
रंगीबेरंगी कुकुचकु कोंबडा
पहाट होता आरवत राहतो
आमच्या आजीच्या पडवीत
कोण खेळते कोण खेळते
दोन गुबगुबीत ससे
आजीच्या मागे पळत राहते
आमच्या आजीच्या पाळण्यात
कोण बसते कोण बसते
तिथे खेळती बालके दोन
एक बसते दुसरे झोका देते
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
8
6



