0
5
7
4
5
4
जिथे जावे तिथे
जिथे जावे तिथे
लबाडाचे वंशज
सत्याशी भांडणारा
कुठेही दिशेना मज ॥ १
जिथे जावे तिथे
लुच्चेगिरी फसवणूक
सत्याच्या पुजाऱ्याची
जिथे तिथे अडवणूक ॥ २
जिथे जावे तिथे
भेटतात दलाल
गोड गोड बोलून
करतात कंगाल ॥३
जिथे जावे तिथे
लांडगे भ्रष्टाचारी
क्षणात घनिक होणे
नीती त्यांची विषारी ॥४
जिथे जावे तिथे
माणुसकी मेलेली
माणसाची जात असे
पहा दानव झालेली ll ५
दीपककुमार सरदार
ता.लोणार जि.बुलढाणा
0
5
7
4
5
4



