0
4
8
2
9
0
मन
मन आगळं वेगळं
कुणा लागेना रे ठाव
कधी लोण्याहून मऊ
कधी पोलादाचा घाव.. //
कुणा मनातला कसा
कुणा उमगावा भाव
कुणी जणू सांब भोळा
ऐसा आणितो रे आव.. //
मन उनाड वादळ
कसं लावावं रे दावं
कधी होवून सैराट
दिशाहीन घेई धावं… //
कधी वंगाळ हळवं
यास द्यावं काय नाव
कधी भूईतं नभातं
यास नसे कांही गाव.. //
कधी निर्मळ जीवन
नसे मोह माया हाव
कधी कुटील जटील
टाकी परतून डाव.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
0



