Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : गोड बोलू या ना 📘*
*🔸मंगळवार : १४ / जानेवारी /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गोड बोलू या ना*

किती दिवस झाले
तुझी माझी कट्टी
आज करूया की
कायमची बट्टी

तिळगुळ खाऊ
गोड गोड बोलू
रूसवा फुगवा
वाऱ्यावर सोडू

कशाला उकरायचे
मागचे उकिरडे
भांडण तंटा
विसरू सगळे

पतंग उडवू
रंग बिरंगी
मैत्रीची वाजवू
नव्याने पुंगी

आईने सांगितले
नाती जपू या ना
त्यासाठी आजपासून
गोड बोलू या ना

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*गोड बोलू या ना*

संक्रांतीचा सण आला
तीळ गुळ करते आई
तीळा इतकाच गोडवा
मनी जप म्हणते ताई

सर्व या रे संवंगडी
आज माझ्या घरी
आपण सर्वच जाऊ
या उद्या तुमच्या घरी

एकमेकांना तीळ गुळ
देऊन गोड बोलू या ना
गोडवा उतरवून मनात
प्रेमाने,स्नेहाने वागू या ना

पतंग उडविण्याचा खेळ
संवंगडी आपण खेळू या
दोरा गच्च ओढून घेऊन
आकाशात पतंग नेऊ या

पिंटूची पतंग खाली आली
चिंटूची पतंग उंचच उंच गेली
मित्रांमध्ये खुप रंगत चढली
खेळात मौजच मौज आली

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*गोड बोलू या ना*

जपूया बालमने गोजीरी
शब्दाने विश्वास देऊन
बालमना देऊ या उभारी
गोड बोलू या ना समजून ॥१॥

आस आहे उडण्याची
त्यांना मुक्त उडू द्या
निष्षाप निरागसता
फुलपाखरासम बागडू द्या ॥२॥

पखांत बळ येऊ द्या
निसर्गशोभा अनुभवू द्या
कुरवळणारा हात
अंगावर फिरू द्या ॥३॥

अथांग सागराला
ओढ किनाऱ्याची
तशी बालमनाला
जिद्द जिंकण्याची ॥४॥

प्रेमाचा घडा ओतप्रोत
ममतेने गोड बोलू या ना
क्षण मौज-मस्तीत
तया लुटु द्या ना ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गोड बोलू या ना*

जपू या आपण
आपली बालमने
वागू आपण चांगले
बोलू सर्वांशी प्रेमाने

नको भांडण तंटा
नको नकली मुखवटा
दाखवू असली रुप
मित्र मित्र खेळू खुप

चला आली आता
नव्या सालाची संक्रांत
चला लाडू मुरे खाऊ
जाऊन बसू एकांत

देऊ सर्वांना तिळगुळ
अन गोड बोलू या ना
बोरं गाजर वटाना
वाटू लहान मुलांना

आजू बाजू शेजारी
असतात महा भारी
त्यांना देऊ तिळ गुळ
करू यात्रेची सवारी

यारे या मुलांनो
खाऊ तिळगुळ मिळून
ऐकमेकांना देऊ सुभेच्छा
प्रेम रस वाहील मनातून

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार. समुह*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*गोड बोलू या ना*

आला संक्रांतीचा सण
तिळगुळ केले घरोघरी
देऊ आणि घेऊ तिळगुळ
देऊ शुभेच्छा परोपरी

तिळगुळ देऊनिया
गोड बोलू या ना
नकोच भांडण तंटा
समजून घेऊ या ना

आपण सर्व बालमित्र
पतंगाचा खेळू खेळ
पाडु ना कुणाची पतंग
आकाशी बघू पतंग मेळ

घेऊ आज शपथ आपण
वाद कधीही नाही करणार
गोड गोड बोलून सर्वांशी
प्रत्येकाची मने जिंकणार

दिवस,महिने,वर्ष जातील
क्षणोक्षणी गोड बोलू प्रेमाने
टिकतील आमचे नाते संबंध
राहू या सर्व सौख्यभराने

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*गोड बोलू या ना*

संक्रातीचा दिवस
सुट्टी मिळाली आज
तिळाचा आला वास
बाळाला आणू साज

लुट त्याची करू
मिठाईचे दागिने
गोड बोलू या ना
खारवले शेंगदाणे

खमंग भाजले तिळ
आईच्या हातची चव
आजी तू लाडू वळ
करू नका पळापळ

गोड बोलू या ना
पतंग ही उडवू
नायलॉन चा मांजा
नका तुम्ही वापरु

सण आनंदाचा
मिळून सारे राहू
मान आहे तिळाचा
गोड गोड बोलू

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*गोड बोलू या ना*

कोण खाईल खरवड?
अन कोण खाईल साय?
तू पेजो रे दूध
मणली मायी माय

चिक पायजे मले
मी बसलो रुसून
माय आली लाडात
देल्ल मडकं पुसून

मायी बहीन आली रागात
तिनं मडकं टाकलं फोडून
माय नं आणली मोठीजात काडी
तिनं तिले काढलं फोडून

पाय आपटत बहीण मायी
बसली कवाड लावून
सारे धावले मनवाले
मणे मले मारलं काऊण?

लाडाची वं पोरगी माही
आज करते तूही लूट
साखरीचे दागिणे घालते तुले
आज तूले सर्व गुन्हे सुट

या रे पोरहो राग विसरून
गोड गोड बोलू या ना
पोरगी श्रेष्ठ कि पोरगा
हे सारं विसरू या

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*गोड बोलू या ना*

तिळ घेतले वाटून
गूळ घेतला बारीक करून
लाडू बनवले गोल गोल
आता तरी माझ्याशी गोड बोल

आला सन संक्रातीचा
गोड तिळगुळ खाण्याचा
गोड तिळगुळ देण्याचा
आनंदाने खेळण्याचा

चला उंच डोंगरावरी
पतंगाची दोरी हातात धरी
उंच पतंग कोणाचा
ताई आणि दादाचा

तक्रार नाही करायची
भांडणं नाही करायची
समजून घेऊ या ना
गोड बोलू या ना

*श्री पोपट सुखदेव मस्के*
*भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*गोड बोलू या ना*

मित्रा आता आपण गोड बोलू या ना
आज पासून आपला अबोला सोडू या ना…१

कायम आपण आता आनंदातच राहू
आपल्या मैत्रीचे गोड गाणे गाऊ….२

जुन्या चुका आज खोडून काढू
एका अंगणात आपण आनंदाने वाढू…३

झालेल्या चुका खड्ड्यात घालू या ना
तिळगुळ खाऊन गोड बोलू या ना…४

एकमेकांच्या आधाराने खुप पुढे जाऊ
प्रत्येकाच्या मनांगणी आनंदाचे झाड लावू….५

हा जन्म नाही रे मित्रांनो पुन्हा
वाईट बोलण्याचा नका करू गुन्हा…६

आज संक्रांतीपासून कायम गोड बोलू या ना
गोड तिळगुळ खाऊन आपले मन खोलून या ना…७

गोड बोलण्याचे फायदे फार
मित्र वाढवू रोज नवे चार…८

गोड गोड बोलून जग जिंकता येते
सकारात्मक विचाराने मन प्रसन्न राहते..९

चला आता मग सर्व मित्रांना भेटू
गोड गोड तिळगुळ सर्वांना वाटू….१०

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*गोड बोलू या ना*

नववर्षातील सण संक्रांत
विचार संक्रमण करूया ना
तिळगुळ देवून आजपासून
आपण सारे गोड बोलूया ना…

गोड शब्दांत जादूच न्यारी
प्रेमाने जग जिंकता येते ना
नको विषारी शब्द जिभेवर
धारदार शब्द नाते तोडते ना…

रागाला जिंकण्यासाठी फक्त
शब्द प्रेमळ गोड बोलू या ना
थंड होईल राग समोरच्याचा
थोडासा संयम बाळगू या ना…

आपल्या सर्व शरीर मनावर
वाणीचा परिणाम होतो ना
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
म्हणून तरी गोड बोलू या ना…

गोड बोलण्याला पैसे नोटा
लागतात का कधी कुणा
सर्व काही फुकट मिळतंय
आजपासून गोड बोलू या ना..

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💎🌷♾️♾️♾️♾️
*〽️या सत्रातील वार्षिक सभासद नोंदणी करून उपकृत करावे〽️*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे