0
4
8
2
8
7
लोकशाहीची हत्या
राजकारण आहे का
भरला बाजार पैशाचा
बोली व्यवहाराची होता
भाव ठरे उमेदवारांचा
जागा कमी भरल्यावर
काळजी का करायची
उमेदवार विकत घेऊन
संधी साधून घ्यायची
सत्ता हातात येताच
पोळी भाजून घ्यायची
निष्ठा गेली आता चुलीत
ही हत्या लोकशाहीची
खुर्चीवर डोळा ठेवून
नाटक करती जनसेवेचे
सत्तेसाठी कधी लाचारी
मारेकरी हे लोकशाहीचे
नीतिमत्ता आता पायदळी
राजकारण झाला आखाडा
जनहिताची हो ऐशीतैशी
लोकसभेत तंटा बखेडा
वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जिल्हा सांगली
0
4
8
2
8
7



