
0
6
2
9
2
1
शेतकरी राजा
काळ्या आईच्या कुशीत
शेतकरी दादा बी पेरतो
उन्हातान्हात राबूनही तो
सर्वांसाठी आनंदाने जगतो
त्याच्या हातात नांगर नि
माथ्यावरती घाम असतो
जगाचा पोशिंदा तो माझा
शेतकरी राजा महान असतो
कधी पाऊस धोका देतो
तर कधी दुष्काळ छळतो
तरी न डगमगता तो पुन्हा
नव्याने शेतात बीज पेरतो
पिके डोलती शिवारात तेव्हा
त्याचे डोळे पाणावतात
त्याच्या कष्टाचे मोल या
जगाला कधी कळणार
नतमस्तक होऊया आपण
शेतकरी राजाच्या चरणी
तो जगला तरच फुलेल
अपुली ही धरणी
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
=========
0
6
2
9
2
1



