
0
6
2
9
2
1
मुकी फुले
दिनूच्या आईला
फुलांचे वेड होते
विविध फुलझाडे
घरी लावले होते
रंगीबेरंगी सुंदर
फुलपाखरे आली
फुलांच्या बागेत
खुप खुप रमली
फुलपाखरे बघून
दिनू खुश झाला
आणखी फुलझाडे
लावू आईला म्हणाला
मुकी फुले दारी फुलली
सौंदर्य वाढल घराच
सुगंधित झाला परिसर
महत्व कळलं झाडाच
आई सांगत असे दिनूला
फुले तोडू नये झाडांची
मुकी फुले नाजूक असतात
काळजी घ्यावी तयांची
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि चंद्रपूर
=========
0
6
2
9
2
1



