Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 9 7

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : अर्धचंद्र📘*
*🔸मंगळवार : ०२ /सप्टेंबर /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अर्धचंद्र*

अर्धचंद्र आकाशात
आज रात्री दिसला
चाले माझ्यासोबत
लपलाही क्षणात

किती धारदार
विळीप्रमाणे दिसे
हात लावून पाहावे
मनात भिती वाटे

अर्धचंद्र तेजस्वी
ताऱ्याच्या पुंजक्यात
स्पष्ट भासे मनस्वी
घ्यावे का ओच्यात

अर्धचंद्राचा उजेड
लख्ख जरी न पडला
होणार कलेकलेने
पुर्ण वाढ पौर्णिमेला

रात्रीची वाट पाहतो
अंगणात सारे बसून
गप्पाही मस्त करतो
अर्धचंद्राला आठवून

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️
*अर्धचंद्र*

चांदोबा चांदोबा
दिसतो किती छान
आकाशाच्या राजाचा
असे तुला मान

चांदण्यांच्या पंगतीत
मिळते तुला स्थान
पाहुनी रूप तुझे
हरपते माझे भान

कलेकलेने वाढतो
चंद्रकला साजिरी
अर्धचंद्राकृती दिसे
नभात गोजिरी

पौर्णिमेला किती
सुंदर तू दिसतो
अमावस्येच्या रात्री
कुठे तू लपतो

मलाही खेळायला
चांदोमामा नेशील का ?
रात्रभर तुझ्या सवे
मला फिरवशील का?

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️
*अर्धचंद्र*

बाळांनो चला सारे
आज गाणे गाऊ या
गाता गाता थोडेतरी
आपण अंक शिकूया….!!

दोन अर्धेचंद्र समोर
उभी काठी काढूया
पहिला अंक सोपा
त्याला एक म्हणूया…!!

आडवा अर्धचंद्र नि
आडवी काठी जोडू
दुसरा अंकही सोपा
बाळांनो दोन काढू….!!

अर्धेचंद्र दोन आडवे
एकमेकांना चिकटला
तिसरा अंक तीन बघा
काढतांना सोपा वाटला…!!

पूर्ण चंद्राच्या डोक्यावर
अर्धचंद्र जाऊन बसला
चौथा अंक चार बाळांनो
फळ्यावर गालात हसला…!!

आभाळाकडे तोंड नि
उजव्या हातात काठी
अर्धचंद्र उभा बाळांनो
खास पाच अंकासाठी…!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अर्धचंद्र*

आकाशी चांदोमामा
आला आला आला
चला मुलांनो
खेळायला चला

खेळ खेळू लपंडाव
एक दोन तीन
येऊ का? येऊ का?
चांदण्याची मिनमिन

लपला बघा चांदोमामा
चला आता शोधू
अंधाराच्या कुशीत
खेळून खेळून निजू

डाव सोडला अर्ध्यात
चांदोमामा रुसला
अर्धचंद्र होऊन
उपाशी बसला

झाला बारीक बारीक
चला त्याला बोलू
चॉकलेट गोळ्यांची
जादुई पोटली खोलू

हसला बघा चांदोबा
खूप मज्जा आली
रोज रोज खेळायचे
भांडणे जरी झाली

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️
*अर्धचंद्र*

आम्ही लहान मुलेच
आणि तो चांदोमामा
नातं आमचं जवळचं
तुम्हीचं येतात कामा…

आई आम्हा जेंव्हा की
जोजवता अंगाई गाई
लिंबोनीच्या झाडामागे
तेंव्हा चंद्र झोपी जाई

आमावशा ते पौर्णिमा
चालूचं तुमचा प्रवास
कधी दिसेनासे होतो
कधी पुर्ण होता खास

कलेकलेने वाढत जाई
जीवनाचे सार सांगून
ढगांच्या आड अदृश्य
कधी जाई दर्शन देऊन

अर्धंचंद्र असता तुम्ही
दिसता ढगात दडलेले
पूर्णत्वाकडे जाता येते
तुम्ही रहस्य उलगडले

कलेकलेने वाढत जात
चढे आलेख प्रगतीचा
येईल काळोख सामोरे
प्रकाश दिसेल पुढचा

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️
*अर्धचंद्र*

चांदण्या रातीला
दिसते आकाशी
अर्धचंद्र कोर
सोनेरी शोभेशी…१

लुकलूक तारे
खूपच पसारे
झोंबणारे वारे
सुटलेय सारे…२

चांदोबा चांदोबा
येशील खेळाया
सोबत चांदण्या
त्यांनाही घेऊया…३

खेळू लपाछपी
डाव मी घेणार
कोण माझे डोळे
घट्ट बांधणार…४

चांदोबा चांदोबा
आता तुझा डाव
येशी पटकन
नको खाऊ भाव…५

चांदोबा चांदोबा
नको जाऊ वर
सगळ्या सोबत
गप्पा टप्पा मार..६

*सौ.माधुरी शेवाळे,पाटील*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️
*अर्धचंद्र*

चला मुलांनो चला
आकाशात जाऊया
सूर्य, चंद्र, ग्रह, तारे
गमती जमती पाहूया…//

दिवसभर फिरतो
सूर्य जसाच्या तसा
प्रश्न कधी पडतो का
अर्धचंद्र होतो कसा… //

असते जेव्हा पौर्णिमा
चंद्र छान गोलाकार
मात्र रोज थोडा थोडा
घटतो त्याचा आकार.. //

ऐका मुलांनो ऐका
देऊन चांगले लक्ष
एका महिन्याचे दोन
कृष्ण, शुक्ल पक्ष… //

पौर्णिमा ते अमावस्या
चंद्र घटतो कलेकलेने
अमावस्या ते पौर्णिमा
पुन्हा वाढतो कलेकलेने.. //

अर्धचंद्र ते पूर्णचंद्र
दिसे पूनवेच्या राती
आणि सोबत चांदण्या
जसे चमकते मोती.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️
*अर्धचंद्र*

झोपी जा रे गोजिरवाण्या,
चंद्र आला नभामध्ये,
अर्धचंद्र हसरा बघ रे,
झुलवी तुला कुशीत घे.

तारे सारे गातात गाणी,
ढग देतात झुलता झोका,
चंद्र म्हणतो “झोप रे बाळा,
आई आहे जवळ तुझ्या.”

डुलता डुलता गाणं गाऊ,
चंद्राशी खेळू हळुवार,
गोड गोड स्वप्नं येऊनी,
भरतील आनंद अपार.

आईचे गाणे, चंद्राचा गारवा,
ताऱ्यांची चमचमतली रांगोळी,
झोपी जा रे माझ्या बाळा,
रात्र झाली सुंदर फुली.

झोपी जा गोजिरा मोती,
डोळे मिट रे स्वप्न पाहा,
अर्धचंद्र होईल सोबती,
आईसंगे रात्र घालवा.

*महेश पुरसों काणकोणकर*
*कालापूर बांध तिसवाडी गोवा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️
*अर्धचंद्र*

अर्धचंद्र होऊनी
आला तो आकाशी
चेहरा त्याचा कोमेजलेला
होता तो उपाशी

चांदण्या सारे जमून
बघत होते त्याला
रुसलेला होता तो
हे माहीत नव्हते कुणाला

ढगाच्या कुशीत तो
होता झोपलेला
शोधत होते त्याला
दिसत होता लपलेला

वाटत होता त्याला
आपण का दिसतो लहान
सारे चांदण्या म्हणायचे
अरे तू आहेस महान

हळू हळू तू होशील
एक दिवस खूप मोठा
पूर्ण आकृती मध्ये येशील
आता शोध आपल्या वाटा

कर भ्रमण तू आकाशी
बाग सारे चिमणी पाखरे
काळे पांढरे ढग सोबती तुझे
वाहू लागले आता मंद मंद वारे

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️
*अर्धचंद्र*

अर्धचंद्र अष्टमीचा
पौर्णिमेला पूर्णगोल
कलेकलेने वाढतो
किमया ही अनमोल

प्रतिपदेपासून पुन्हा
कमी होतो कलेकलेने
अष्टमीला अर्धचंद्र
अमावस्येला लुप्त पूर्ण

अष्टमीला चंद्रामुळे
येई भांगाची भरती
दृश्य विलोभनिय दिसे
सागरी चंद्राची शक्ती

कळेल का रे चांदोबा
तुझे लपणे नी उगवणे
मलाही वाटे तुजसवे
विहरावे नभी आनंदाने

कृष्णाष्टमी,शुक्लाष्टमीला
दिसते तुझे अर्धरूप
मनाला पडते कोडे
कसे बदलते तुझे हे रूप

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🤎🌗🤎♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे