Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

आत्मजागृती

विष्णू संकपाळ

0 4 8 2 8 4

आत्मजागृती

आधी स्वतः अनुभवावे
मगच इतराशी सांगावे
स्वानुभव हेच खरे प्रमाण
सदा सर्वदा सत्य मानावे.. //

आपण कोरडे पाषाण
लोकास सांगे ब्रम्हज्ञान
होतोय अशा लोकांचा
चारचौघात अपमान.. //

स्वयंघोषित पांडित्य
कधीतरी फोल ठरते
वाचाळवीर म्हणून घेणे
इतकेच हातात उरते… //

यासाठीच आत्मजागृती
करेल स्वतःला परिपूर्ण
स्वत्वशील आचार विचार
आदर्श बनावे व्यक्तिमत्व.. //

अधिकारवाणीने बोलावे
इतके व्हावे स्वयंसिद्ध
जरूर जमतील ऐकणारे
मात्र तत्त्वाशी हवे कटिबद्ध… //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे