Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

महावितरणमधील कंत्राटी कामगारांचे वेतन थकले; आंदोलनाचा इशारा

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

महावितरणमधील कंत्राटी कामगारांचे वेतन थकले; आंदोलनाचा इशारा

नागपूर शहर प्रतिनिधी

नागपूर – (दि.१८) : महावितरण अंतर्गत विविध उपकेंद्रांवर कार्यरत कंत्राटी कामगारांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकीत असल्याचा गंभीर आरोप करत तांत्रिक अॅप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात मा. संचालक (मानव संसाधन), महावितरण यांना निवेदन देण्यात आले असून सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी सांगितले.
संघटनेच्या निवेदनानुसार स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांना ऑगस्ट २०२५ पासून महावितरणच्या ३२९ उपकेंद्रांवर कंत्राटी कामगार पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र, संबंधित कंपन्यांनी ऑगस्ट २०२५ (स्मार्ट सर्व्हिसेस) व डिसेंबर २०२५ (क्रिस्टल इंटिग्रेटेड) पासून आजतागायत वेतन अदा केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेकडो कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वाशीम विभागातील कंत्राटी कामगार स्व. केशव वाकुडकर यांचा १ डिसेंबर २०२५ रोजी ड्युटीवर येत असताना अपघाती मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नियमांनुसार मिळणारी भरपाई व आर्थिक मदत अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच स्व. रामभाऊ बोरकर (वाशीम) यांच्या निधनानंतरही संबंधित लाभ न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय कंत्राटी कामगारांना पे-स्लिप देण्यात येत नसल्याची, काही एजन्सीकडून दरमहा १५०० ते २००० रुपये वेतनातून जबरदस्तीने परत घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच ईएसआयसीमध्ये कामगारांच्या कुटुंबीयांची माहिती अद्ययावत नसल्यामुळे वैद्यकीय लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. वाशीम, नागपूर, अकोला, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, भंडारा, गोंदिया आदी मंडळांमध्ये सुरक्षा साहित्य (टी अॅन्ड पी) न दिल्याचाही आरोप आहे.

संघटनेने संबंधित सर्व एजन्सींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, थकीत वेतन तातडीने अदा करावे व कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. सात दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात राज्यातील हजारो कंत्राटी कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन तांत्रिक कंत्रा टी कामगार असोसिएशन चे राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, शेख राहील, अतुल पाटील, शंकर जरकड, अनिल चव्हाण, राम कुटे , अनिवेश देशमुख, कुणाल जिचकार, मंगेश चिमोटे, निलेश चक्रपाणी, विकास ठुसे आदिनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे