Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीपश्चिम महाराष्ट्रपुणे

दुचाकीस धडक देऊन पसार होणा-या ट्रकचालकास युवा क्रांती फाउंडेशनच्या सदस्यांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

0 5 7 4 5 0

दुचाकीस धडक देऊन पसार होणा-या ट्रकचालकास युवा क्रांती फाउंडेशनच्या सदस्यांनी केले पोलिसांच्या स्वाधीन

युवा क्रांती फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेची उत्तम कामगिरी

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे: (दि १२) फुरसुंगी येथे एका टेम्पो चालकाने भरधाव वेगात दोन-तीन दुचाकींना धडक देत गंभीर अपघात घडवून आणला. संबंधित टेम्पो हा जागृती ट्रान्सपोर्टचा असून चालक दारूच्या नशेत असल्याचे समोर आले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. अपघातानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

त्या दरम्यान आम्ही घटनास्थळी जात असताना काही नागरिकांनी आम्हाला माहिती दिली की टेम्पो चालक पळून जात आहे. त्यानुसार आमच्या टीमने तत्काळ पाठलाग करून संबंधित चालकाला पकडले.
त्यानंतर पुढील चौकातील ट्राफिक हवालदारांना या घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली व संबंधित टेम्पो आणि चालक यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या उत्कृष्ट व तत्पर कामगिरीमुळे (Excellent Work) संबंधित टेम्पो व चालक शोधून पकडण्यात यश आले.

कारवाईत सहभागी पदाधिकारी:
▪️ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष – श्री राजू चौधरी
▪️ पश्चिम महाराष्ट्र युवा सचिव – श्री अमितजी तांबे
▪️ पुणे जिल्हा युवा अध्यक्ष – श्री किशोर गायकवाड
▪️ फुरसुंगी युवा सदस्य – श्री महेश कडदेकर
या संपूर्ण कारवाईनंतर येथील नागरिक तसेच पोलिस प्रशासन यांनी युवा क्रांती संघटनेचे मनापासून आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 5 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे