0
4
8
2
9
0
गुरूप्रेम
अष्टाक्षरी रचना
मनी जपावा आदर
माथा झुकावा चरणी
वंद्य गुरू सर्वठायी
मार्ग दाखवी जीवनी—१
गुरू आज्ञा शिरोधार्य
मिळे ज्ञानाची शिदोरी
गुरू जीवनी प्रकाश
ज्योत पेटवी अंतरी—२
गुरू घडवी जीवन
ओल्या मातीला आकार
येई जीवनाला अर्थ
गुरू जगण्याचा सार—३
गुरू स्पर्श परीसाचा
करी जीवनाचे सोने
गंध चंदनाचा सदा
नाही जीवनात उणे—४
देई दिशा जगण्याची
करी व्यक्तित्व घडण
गुरू आशीर्वाद फळ
ज्याला मिळे तो सधन—५
मिळे ज्याला गुरूप्रेम
धन्य त्याचे हे जीवन
तोचि जीवना आधार
देई चित्ती समाधान—६
सर्व नात्याहून श्रेष्ठ
गुरू शिष्य नाते असे
बंध अनोखे अंतरी
शुद्ध भाव जेथे वसे—७
श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे
साईनगर,अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
8
2
9
0



