
0
4
8
2
9
0
हा देश माझा
सुजलाम् सुफलाम् ही धरा
मंगल,पवित्र ही भारत भूमी.
इथे विविध भाषा भाषिकांना
सुखात नांदण्याची मिळे हमी
कृषिप्रधान हा देश माझा
ऋतु प्रमाणे कृषक घेती पिंक..
परदेशात ही वस्तु निर्यात होती
गुणवत्ते अनुसार कमी अधिक..
अनुसंधान, कला ,क्रीडाक्षेत्रात
आज भारताचे अग्रस्थानी नाव
विविध राज्यातील हस्तकला
अन् लघुउद्योजकांना ही इथे वाव..
धर्म,भाषा,वेषभूषा अन् संस्कृती
हर क्षेत्रात रित आगळी वेगळी
सर्वांचे सणवार भिन्न अलग चालीरिती
तरीही एकोप्याने राहतात सगळी..
हिमगिरी, सागरकिनार पट्टया
विभिन्न ऋतु, विपुल वनसंपदा…
असा सर्वगुणसंपन्न. एकमेव
हा देश माझा,हा देश माझा..
मदुला कांबळे
गोरेगाव-रायगड
=======
0
4
8
2
9
0



