Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरभंडारा

जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिनाचे आयोजन

0 4 8 2 9 0

जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिनाचे आयोजन

पवनी: जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथे आज ०५/०९/२०२४ गुरूवार रोजी ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे विषय शिक्षक पं स पवनीचे राकेश पारधी, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल , प्राथमिक पदवीधर शिक्षक पांडुरंग नखाते व पदवीधर शिक्षिका मधुबाला देशमुख यांनी पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी सर्व विद्यार्थी उपस्थित होते

शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘स्वयंशासन दिनाचे’ आयोजन करण्यात आले. यामध्ये वर्ग ५ ते ७ वीच्या मुलां मुलींनी शिक्षक शिक्षिकेची भूमिका पार पाडत, सर्व वर्गात विषयानुरूप अध्यापनाचे कार्य उत्तमरित्या पार पाडले. यामध्ये धृप विनोद कुंभले, तनुजा शंभू वैद्य, जान्हवी बिसन शेंडे, दिव्या विठ्ठल पोहनकर, सिमरन आशिष रामटेके, खुशी घनश्याम बोलगुंडेवार, डिंपल लक्ष्मीकांत कोरेकर, रिद्धी कोरेकर, आकांक्षा बतुलवार, गौरी किशोर पोहनकर, आस्था खेमराज खोब्रागडे, अक्षरा मनोज एंचिलवार, ओम अनिल पडोळे, आदित्य दिलीप पोहनकर इत्यादी विद्यार्थी सहभागी होते.

याप्रसंगी मुख्यध्यापक श्री प्रवीण पडवाल सर, राकेश पारधी सर, प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री पांडुरंग नखाते सर, पदवीधर शिक्षिका मधुबाला देशमुख, पाटील सर उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे