0
4
8
2
9
3
नवस्पर्श मनीचे
नवस्पर्श मनीचे
या नव संवेदना
फुलती कधी झुरती
या कशा वेदना
स्वप्ननगरीतील हा
खुला वावर समजेना
मुक्त मिळे भाव
सोडून त्या बंधना
जागृत मनी
कळ निराळी
जगण्याची ही
रीत आगळी
जुळे न संदर्भ
सुप्त मनाचा
कल्लोळ उगाच
दाटे भावनांचा
कुणा उलगडले
कोडे प्रकृतीचे
उलगडणार कसे
स्वप्न वास्तवाचे
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
0
4
8
2
9
3



