0
4
8
2
8
6
माझी कन्या
सालस्य, सामंजस्य अन्
विचारांची प्रगल्भता
हसतमुख चेहर्यावर
न दिसावी चिंतेची लवलेशा ।।
मनामध्ये गुपितांना
कधी नसावा ठाव
असेल ते बोलून द्यावे
असा तिचा भाव ।।
सद्विचारांची कन्या माझी
दिसते लक्ष्मीचे रूप
तिच्या बोलण्यातून मिळे
मज बळ खुप ।।
सारे विश्व माझे
सामावले तिच्यात
तिच माझी सखी
मायही दिसते तिच्यात ।।
प्रेमळ छबी तिची
डोळ्यात साठवते
सदैव सुखी रहावी
मागणे देवास मागते ।।
कंचना मंडपे
नागपूर
=========
0
4
8
2
8
6



