अहमदनगरकवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
रक्षाबंधन; राजश्री ढाकणे-मिसाळ
0
4
8
2
9
7
रक्षाबंधन
दारी सडा रांगोळी नि
हाती औक्षणाचे ताट
रक्षाबंधनाला ताई
बघे दादाचीच वाट…!!
तिच्या आनंदाला जणू
आली सागर भरती
खास मेनू आवडीचा
ताई मुद्दाम करती…!!
वाट पाहून पाहून
तिचे डोळेही शिणले
खूप कामे होती आज
त्याला नाही हो बनले…!!
आठवले बालपण
कंठ दाटूनिया आला
सांग ना रे दादा खरे
आज कसा नाही आला …!!
साडीचोळी भेट नको
राखी बांधून घे हाती
ठेवू अबाधित आज
घट्ट धाग्याने ही नाती..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
============
0
4
8
2
9
7



