0
4
8
2
9
0
रेशीम धागे
रेशीम धागे तुझ्या शब्दांचे
मी माझ्या शब्दांत गुंफले
प्रत्येक गाठ सांगते काही
मन मनात सहज गुंतले…
चंद्र सावलीला बिलगावा
तशी मी तुझ्यात रंगते
तुझ्या स्पर्शाच्या तालावर
हृदयाची तार झंकारते …
तुझ्या नजरेच्या गारव्यात
पानगळ ही वसंत भासते
सुगंध फुलाचा जरा उधळता
जणू चैतन्य जीवाला लाभते..
रेशीम धागे तुटणार नाहीत
जरी वादळे येवोत किती
मला तुझी सोबत असताना
कसलीच वाटत नाही भीती…
तुझे स्पर्श मऊ मखमली
हृदयावर मी जपून ठेवते
एकांतात कधी आठवता
ओठी हर्ष लकेर उमटते…
वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
========
0
4
8
2
9
0



