Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

ऐक सखे

स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

0 4 8 2 9 0

ऐक सखे

स्त्री शिकली, शिक्षित झाली
उंबरठ्यातून बाहेर पडली..
पण रोजच्या धावपळीत ती
स्वअस्तित्वच विसरली..!

आदर्श सून, आदर्श पत्नी
अन् झालीस आदर्श माता..
जीव मात्र थकायचा तुझा
सगळ्यांचं करता करता..!

जीव तर थकायचाच
पण मनालाही थकवलंस..
स्वतःच्या इच्छा आकांक्षाना
अंतरीच दबवलंस..!

सगळ्यांचं करताना
ठेव भान स्वतःचं..
ऐक सखे तू ही जरा
दबून गेलेल्या मनाचं..

वेळ काढून भेट मनाला
ऐक अंतरीची साद..
फुलव छंद स्वतः चे
अन् घुमू दे अंतर्नाद..

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे