विरली येथे शिवजयंती उत्साहात साजरी
रजत डेकाटे
उमरेड/मालेवाडा
नागपूर/उमरेड: (दि २० फेब्रुवारी) उमरेड तहसील अंतर्गत येत असलेल्या विरली येथे शिवजयंती सोहळा (दि १९) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सोहळा विरली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात पार पडला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुनील मेश्राम यांची उपस्थिती लाभली होती. तत्पूर्वी मेश्राम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला. सुनील मेश्राम यांनी शारदा उत्सव मंडळ विरली यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.
यावेळी शुभम पोरकुट, राहुल भेंडारकर, सचिन काकडे, भूषण भुजाडे, प्रमोद धोबी, स्वप्निल चौधरी, मयूर जांभुळकर, शिवम सोनुले, लखन वारे, विशाल चौधरी, प्रणव मानमोडे, संकेत राऊत, साहिल किरमोरे, आर्यन मेश्राम, सक्षम राऊत यांची यावेळी उपस्थिती होती.



