0
4
8
2
9
7
श्रावणमास
आला आला श्रावणमास
सर्वांचा लाडका मनभावन
घेऊन प्रीत अन् भक्ती
सर्वत्र चैतन्यमय वातावरण.
क्षणात उन क्षणात पाऊस
बदल निसर्गाचे क्षणोक्षणी
मुक्त उधळण करीत येतो
घेऊन सणांची मेजवानी.
हिरवा शालू नेसून वधू
नार नवेली नटली धरा
रूप पाहता मनोहारी तिचे
हृदयांगणी पडे चांदणचुरा.
अनोखा दाटला आनंद
श्रावणसरीत चिंब मन
प्रीत वारा झोंबला अंगी
बेधुंद करीत ते प्रीतक्षण.
लपंडावाचा खेळ खेळत
सोनपिवळा श्रावण हिरवा
तनमनाला मोहविणारा
प्रेमीयुगुलांचा ऋतू बरवा.
सौ.सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली.
0
4
8
2
9
7



