Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनगोंदियाविदर्भ

इंग्रजी विभागाद्वारे ‘दान पारमिता’चे महत्व समजावण्याकरिता शैक्षणिक सहलीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया

0 4 8 2 9 4

इंग्रजी विभागाद्वारे ‘दान पारमिता’चे महत्व समजावण्याकरिता शैक्षणिक सहलीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया

गोंदिया: स्थानिक एम बी पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय सालेकसा येथील इंग्रजी विभागाद्वारे ग्राम रोंढा येथे ‘दान पारमिता’चे महत्व समजावण्याकरिता शैक्षणिक सहलेचे आयोजन करण्यात आले.

इंग्रजी विभागाद्वारे गावातील काही गरजु लोकांना विद्यार्थ्यांच्या हस्ते अन्न धान्य व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. भगवान महावीर, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना संबोधित करतांना कार्यक्रमाचे आयोजक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. परिमल डोंगरे यांनी दान पारमिता काय आहे, ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक , आध्यात्मिक व व्यक्तित्व विकासासाठी तसेच समाजाच्या आर्थिक आणि गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकासासाठी कश्या प्रकारे महत्त्वपूर्ण आहे हे सांगितले.

तसेच या थोर महापुरुषांच्या जीवनात दान पारमिता चे कश्या प्रकारे महत्त्वपूर्ण स्थान होते या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. या आयोजनात रोंढा गावाच्या सरपंच श्रीमती नूतनताई लिल्हारे व श्री खेमराज लिल्हारे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या प्रसंगी डॉ. परिमल डोंगरे आणि चिंतेश नागपुरे, अंशू ढेकवार व निखिल लिल्हारे या विद्यार्थ्यांनी सन्माननीय सरपंच श्रीमती नूतनताई लिल्हारे यांच्या सोबत भविष्यात सालेकसा तालुक्यात इंग्रजी विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांबद्दल चर्चा केली. सहलेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. जैन यांनी शूभेच्छा दिल्या व भविष्यात सुध्दा अश्या प्रकारच्या नाविन्यपूर्ण आयोजनाकरिता प्रेरित केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे