पाऊले चालती शाळेची वाट
पाऊले चालती शाळेची वाट
सुखी जीवनाची करु सुरुवात
पाऊले चालती……||धृ||
शिक्षणाशिवाय माणूस
निव्वळ असे धोंडा
गाडगेबाबांचा मंत्र हा
घेऊया जाणून थोडा
पाटी पुस्तक घेऊन हाती
गिरवुया पाठ
पाऊले चालती…||१||
शिक्षण हा मानवाचा
आहे तिसरा डोळा
ऐकलोय आपणही
कितीतरी वेळा
सावित्री ज्योतिबांचे
करु पुजापाठ
पाऊले चालती…||२||
शिका संघटित व्हा संघर्ष करा
सांगून जना गेले
बाबासाहेब आंबेडकर
घटनाकार हो झाले
त्यांचा मंत्र जाणून मनी
करु सुरुवात
पाऊले चालती…||३||
मुलगा मुलगी असा
नको भेदभाव
मुलगी पण संसाराची
असते एक नाव
गर्भातच मरणासंगे तिची
नका हो मारु गाठ
पाऊले चालती..||४||
शासनाच्या मोफत सक्तीचा
आला शिक्षणाघा कायदा
होतोय आमचा त्यातून
सर्वांगीण असा फायदा
शासनाच्या धोरणाकडे
नका फिरवू पाठ
पाऊले चालती…||५||
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=========



