0
4
8
3
0
1
माणूस: एक प्रतिबिंब
मानवी बाह्य रंगाचे प्रतिबिंब
दिसते मजला आरशात
माणूस: एक प्रतिबिंब
स्वत: स्वतःलाच फसवित
आत्मपरीक्षणाची ज्योत पेटवून
ज्ञानमय जीवन सुखी करून
आनंदीमय जीवन आपलेच
स्वतःचे गुणदोष ओळखून
मी कशाला आरशात पाहू
माझेच प्रतिबिंब डोळ्यात दिसते
दिवस रात्र केलेल्या कष्टाचे फळ
आत्मविश्वास, आनंद बहरून येते
जसा भावभावना उमटती चेहऱ्यावर
माणसाचे प्रतिबिंब दिसते आरशात
मनाचा आरसा स्वच्छ सुंदर
कुणाच्या भावभावना नदुखवत
धागा माणुसकीचा जपून
भावभावनांना जणू भिजेचिंब
आपले सुंदर असे रूप पहावे
मानवी शरीर भासे प्रतिबिंब
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
4
8
3
0
1



