महामानव
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव

महामानव
ज्ञानदीप पेटवणारा तो महामानव महान,
अंधारलेल्या जीवनाला दिला उजेडाचा मान…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव जरी घेतले,
शिक्षणाच्या वाटेवर लाखो जीव उजळले…
“शिका…” हा शब्द नव्हता फक्त एक उपदेश,
तो होता दुःखातून बाहेर पडण्याचा संदेश…
वंचितांच्या डोळ्यात त्यांनी स्वप्न रंगविले,
शिक्षणाच्या शक्तीने आयुष्य नव्याने घडविले…
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे…” म्हणताना,
त्यांच्या शब्दांत होती क्रांतीची ज्वाला पेटताना…
जो पिईल तो उभा राहील स्वाभिमानाने,
अन्यायाला उत्तर देईल ठाम निर्धाराने…
त्यांच्या लेखणीने दिला आम्हाला विचारांचा दीप,
अज्ञानाच्या अंधारातून दाखविला
ज्ञानाचा मार्ग सुंदर, अतीव…
गरीबांच्या ओंजळीत ठेवले स्वप्नांचे दान,
“शिका आणि घडा स्वतःला…” हेच त्यांचे खरे वचन…
आजही त्यांच्या शब्दांत आहे तीच ऊब,
मनाला स्पर्शणारी, जीवनाला देणारी नवी शुभ…
बाबासाहेबांच्या विचारांनी घडू दे प्रत्येक जीव,
शिक्षणाच्या प्रकाशाने उजळू दे हा सारा विश्व
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
बेडगा ता उमरगा जिल्हा धाराशिव
=======



