बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासचे सामूहिक नृत्य स्पर्धेत सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासचे सामूहिक नृत्य स्पर्धेत सुयश
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: शुक्रवार दि.३ जानेवारी २०२५ रोजी राजा शिवछत्रपती क्रीडांगण, किहीम येथे लायन्स क्लब ऑफ अलिबाग-मांडवा आयोजित लायन्स किहीम फेस्टिव्हल मध्ये शालेय सामुहीक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासच्या श्री. रणजीत राणे क्रीडा व सामाजिक विकास मंडळाच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् या देशभक्तीपर गीतावर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आणि द्वितीय क्रमांक पटकाविला.
विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणात आपल्या भारतमाते विषयीचा जाज्वल्य देशाभिमान, देशप्रेम आणि विद्यार्थ्यांवरील विद्यालयाच्या शिस्तबद्ध संस्कारांचे प्रतिबिंब ठळकपणे प्रकट झाले. प्रेक्षकांनी उभे राहून विद्यार्थ्यांच्या नृत्यकलेला दिलेली दाद आणि कौतुकाचा वर्षाव हा क्षण अविस्मरणीय ठरला. या यशामुळे विद्यालयाचा नावलौकिक अधिकच वाढला आहे.
आयोजकांच्या वतीने विद्यार्थ्यांना ३००० रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ. सा. धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



