Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखबीडमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

एक दिवस तरी हवी ” रानशाळा”; शर्मिला देशमुख

मंगळवारीय आम्ही बालकवी "बालकाव्य" स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 7

एक दिवस तरी हवी ” रानशाळा”; शर्मिला देशमुख

मंगळवारीय आम्ही बालकवी “बालकाव्य” स्पर्धेचे परीक्षण

निसर्गा पासून दुरावलेल्या बाळा
एक दिवस तरी हवी तुजसाठी रानशाळा

काय ते दिवस ..काय त्या आठवणी ..आणि काय ते आमचे बालपण..! दिवस उगवायचा तो आमच्या पायाला भिंगरी बांधूनच. उठल्या पासून चिमणी सारखे झोपेपर्यंत तो निसर्गाचा सहवास.अहाहा ! किती विलोभनीय! गावात चौथीपर्यंत शिक्षण पुढचे शिक्षण 4 किमी चालत जाणे आणि चार किमी येणे .पण तो थकवा पायांना निसर्गाने कधी जाणवूच दिला नाही .प्रत्येक मोसमातील रानमेवा आमच्यासाठी निसर्गाने जणू सजवूनच ठेवलेला असायचा. चिंचा ,बोरे, सिताफळे, पेरू, आंबे आणि या चविष्ट रानमेव्यांच्या शोधात आम्ही दूर दूर पर्यंत केलेली पायपीट .आज सगळेच कसे स्वप्नवत ,स्वप्नवत यासाठी की हा रानमेवा आजच्या चिमुकल्यांना पाहायलाच मिळतो कुठे?

शाळेत जाता येता निसर्गासोबत घालवलेला वेळ, पक्षी ,प्राणी, अचानक दिसणारे साप, नदीकिनारी आढळणारी रानमांजरे, एक ना अनेक .नदीकाठी तर तासंतास वेळ जाई, पाण्यातील माशांसवे खेळण्यात, पक्षी निरीक्षण, बेडकांचे ओरडणे, पानकोंबड्यांचे पोहणे ,मोरांचे केकाटने, मोरपीस सापडण्यासाठी दूर दूर गायरानात फिरणे हे सगळे आज जणू अविश्वसनीयच. काळ पण तसा “विश्वासू “होता. सगळी माणसे आपलीच असायची. आज काळ बदलला .माणूस माणसाला दिसला की पूर्वी आधार वाटायचा आता भीती वाटते. पक्षी, प्राणी तरी बरे अशी अवस्था असताना, कुठे वावरणार ही चिमुकली मुले रानीवनी आणि माळरानी? कसा मिळणार रानमेवा ?कशी भरणार पाखरांची शाळा? कसा मिळणार निसर्गाचा सहवास ?कशी भरवणार रान शाळा?अन् कसे देणार पर्यावरण शिक्षण?

या नैसर्गिक आनंदापासून कोसो दूर असणारे आजचे विद्यार्थी ,आपले अनुभव कानात जीव आणून ऐकतात ,आपल्या अनुभवात आपला आनंद शोधतात ,आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. खरं म्हणजे निसर्ग प्रेम वाढवण्यासाठी, पर्यावरण संरक्षणासाठी निसर्गाच्या सहवासात रमणे आवश्यक असते. मला वाटते ही जिम्मेदारी शाळांवर येऊन ठेपली आहे. अधून मधून सिमेंटच्या जंगलातून विद्यार्थ्यांना काढून रानावनात, निसर्गात फिरवून आणणे त्यांना निसर्गाचे खरे रूप दाखवणे आवश्यक आहे .निसर्ग शाळा, वनभोजन, क्षेत्रभेट, स्थानिक कामगारांच्या भेटी अशा विविध उपक्रमांमधून ते शक्य आहे. रोज ना परी कधीकधी विद्यार्थ्यांना निसर्ग सहवासाचा आनंद रान शाळा भरवून आपण देऊ शकतो.

मंगळवारीय” बालकाव्य” स्पर्धेचा ‘रानशाळा’ हा अतिशय सुंदर विषय देऊन राहुल दादांनी खरे म्हणजे उपकृत केले म्हणावयास हरकत नाही. आमचे बालकवी पक्षी, प्राणी, निसर्ग, जंगल, वृक्ष,वेली, लता, पाणी यामध्ये आज दिवसभर मनसोक्त फिरून आले आणि फिरत फिरत अभ्यासही केला. अशा पद्धतीने आजची रानशाळा अतिशय सुंदर, विलोभनीय, हवीहवीशी वाटणारी, बालमनाला आकृष्ट करणारी ठरली. आज जणू रानावनातील पायवाटा तुडवत, रानमेवा खात, पक्षी प्राण्यांसोबत जीवनाची शाळा सर्वजन शिकले. असाच समूह निसर्गासमवेत बहरत राहो. मला इतक्या सुंदर बालकाव्य स्पर्धेच्या विषयाचे परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल राहुल दादांचे शतशः आभार. तूर्तास विराम..!!

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक/परीक्षक/कवयित्री
मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे