
0
6
2
9
2
1
अधांतरी
ये रे मेघा, ये रे मेघा
दे पावसाचं दान
चिंब चिंब भिजू दे
कोरडं झालं रान
बरसल्या ना रोहिणी
मृग गेला कोरडा
वाट तुझी बघतेय
आभाळा लावून डोळा
तुझ्या एक एक थेंबाला
आहे अमृताचा गोडवा
जन माणस सुखावतो
भिजून चिंब ओला…
तू आलास कि मित्रा
धरा नटते रे नवरी
हिरव्यागार शालूत
दिसते लाजरी बुजरी
चाफ्या , मोगऱ्यापरी मग!
जमतं तिलाही दळवळणं
तुझ्या विना पावसा!!…..
धरेच अंधातऱी रे जगणं.
इंदू मुडे, ब्रम्हपुरी
जिल्हा चंद्रपूर
0
6
2
9
2
1



