
0
4
8
2
9
4
बिबटे आले गावाकडे
बिबटे आले गावाकडे
फड उसाचे ओस पडले
कोणी न येई कापणीला
मजुरांना उपास घडले.
दहशत मोठी बिबट्यांची
प्रकट होई अचानक
घाला पडेल कोणावर
लोकांना वाटते धाकधूक.
का आला तो गावाकडे
विचार कर तू मानवा
बेसुमार जंगलतोडीने
भक्ष्यांची पडली वानवा.
उसासमारीने तो बेजार
गावाकडे मोर्चा वळला
पाळीव प्राण्यांना मारुन
उपवास तयाने सोडला.
जर मिळेल भक्ष्य जंगलात
का येईल बिबट्या गावाकडे
टाळावी बेसुमार वृक्षतोड
हेच मानवजातीला साकडे.
प्रवीण हरकारे
जि अहिल्यानगर
0
4
8
2
9
4



