Breaking
ई-पेपरकवितानागपूरनांदेडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

इच्छाशक्ती

बळवंत शेषेराव डावकरे

0 4 8 2 9 3

इच्छाशक्ती

संगतीला जोड प्रयत्नांची
सोबत दुर्दम्य इच्छाशक्ती
मन मनगट मेंदूच्या बळावर
सापडेल मग यशाची युक्ती

काम नेटके व्हावे मनातून
ध्यानधारणा प्रबळ असावी
कारणांची नको परिभाषा
नकारात्मकता मनी नसावी

प्रयत्नांती असाध्य ते साध्य
खूणगाठ ही बांधून मनाशी
सचोटीने अखंड करावे कार्य
समायोजन भावभावनांशी

इच्छाशक्ती प्रबळ जयांची
धाडसी टाकतो पाऊल पुढे
घेऊन अनुभवाची शिदोरी
अपयशाचे भेदतो सारे कडे

शिवबांचे जिगरबाज मावळे
शिकवण तयांची ध्यानी धरु
रडणे हा नसे धर्मची आपला
जिद्दीने अपयशावर मात करु

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे