Breaking
ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

गारव्याची गोष्ट

वृंदा(चित्रा)करमरकर सांगली जिल्हा सांगली

0 4 8 2 3 3

गारव्याची गोष्ट

गारव्याची गोष्ट हो कौतुकाची
दुलईतील मखमली ऊबेची
आजीच्या उबदार मिठीची
तिच्या सुंठेच्या गोळीची

शेतातल्या गरम शेकोटीची
त्यात भाजल्या हुरड्याची
वाफाळत्या आल्याच्या चहाची
आईच्या गरम नाश्त्याची

खास माझ्या आवडीचा
आई स्वेटर विणायची
लोकर गुलाबी रंगाची
त्यात ऊब वात्सल्याची

बाजरीची भाकरी तिळाची
भाजी बनायची भोगीची
भरीत चमचमीत वांग्याचे
गंमत घरच्या लोण्याची

धुंदूरमास होई साजरा
सूर्यदेवा नैवेद्य सारा
कोवळ्या उन्हात जेवण
थंडीचा हा महिमा खरा

वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 3 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे