0
4
8
2
8
4
उन्हाळा..
लहानपणी काय माहित कशी
उन्हाळ्याची सुट्टी घालवायचो
दिवसभर तहानभूक विसरून
सवंगड्यांसोबतच बागडायचो..
तमा नव्हती ऊन्हाची गरमीची
उन्हाळा म्हणून आनंदायचो
न शाळा न अभ्यास असायचा
मनसोक्त सुट्टी घालवायचो..
आता मोठे झालो, उन्हाळा
भलताच जाणवायला लागला
नजर फिरवली चहूकडे जरा
निसर्गाचा समतोल बिघडला..
वर्ष सरले तप सरले मानवाचे
आधुनिकीकरण उंचावले
जंगल,झाडी साफ करून
कोक्रिटचे जंगल बळावले…
निसर्गही कसा शांत बसेल
धरेवर कोप त्याने ओकला
पाणी टंचाईची समस्येने
मानव वणवण भटकला..
सौ. प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव -रायगड
0
4
8
2
8
4



